Home धाराशिव सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कळंब शहर पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य एकता...

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कळंब शहर पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य एकता दौड

229

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कळंब शहर पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य एकता दौड

अच्युत पौळ
कळंब,प्रतिनिधी

कळंब जि धाराशिव:- भारताचे लोहपुरुष,भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो यानिमित्ताने दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस स्टेशनच्या वतीने विद्याभवन हायस्कूल कळंब येथून भव्य एकता दौड रॅली काढण्यात आली,हि रॅली, ढोकी रोड , छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्याबाई होळकर चौक , मार्गे येरमाळा रोड येथून पोलीस स्टेशन कळंब येथे पोहंचली या रॅली मध्ये ,भारत माता की जय ! हम सब एक है! वंदे मातरम घोषणांनी परिसर दुमदुमून गेला रॅलीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, पोलिस निरीक्षक अजित चिंतले. मसपोनि प्रभा पुंडगे मॅडम, सपोनि हनुमंत कांबळे, सपोनि पंढरीनाथ मगर, स्थानिक गुन्हा शाखेचे गोविंद मोठेगांवकर,ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, प्राचार्य डॉ. हनुमंत माने, माधवसिंग राजपूत, अच्युत पौळ, रशीद शेख, समर्थ अकॅडमीचे विद्यार्थी, जिजाऊ नगरी शिक्षक कॉलनी नागरीक , ४० पुरुष अंमलदार, १० महीला अंमलदार तसेच कळंब शहरातील ज्येष्ठ नागरिक, व युवकांचा समावेश होता.