पोलिस अधिक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747
पनवेल: केंद्रीय दक्षता आयोग, तसेच राज्य शासनाच्या सूचनेनुसार दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे. या अंतर्गत आज दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना पोलिस अधिक्षक शिवराज पाटील म्हणाले, कोणत्याही प्रलोभनांना न भुलून जाता शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधानाने, प्रामाणिकपणे व सचोटीने काम करावे. तसेच अधिकारी, कर्मचारी व नागरिकांमध्ये भ्रष्ट्राचाराबाबत जनजागृतीची आवश्यकता स्पष्ट करताना त्यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याची माहिती सांगितली.
आपल्या प्रास्ताविकामध्ये आयुक्त मंगेश चितळे यांनी शासकीय सेवेत काम करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व नियंमाचे पालन करत काम सचोटीने,निस्पृह काम करायला हवे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त स्वरूप खारगे यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी मानले.
यावेळी मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते उपायुक्त रविकिरण घोडके, उपायुक्त नानासाहेब कामठे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, लेखाधिकारी संग्राम ऱ्होरकाटे तसेच लाचलुचपत प्रतिबंध विभागचे अप्पर पोलिस निरीक्षक भागवत सोनावणे, पोलिस उप अधिक्षक धर्मा सोनके उपस्थित होते. या कार्यक्रमास महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









