पोलीस अधिकारी आणि पत्रकारांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना
परभणी: परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालय येथील मैदानावर रविवारी सकाळी पोलीस अधिकारी आणि पत्रकार यांच्यात क्रिकेटचा सामना खेळविण्यात आला. या सामन्यात दोन्ही संघाने दमदार कामगिरी केली पोलीस अधिकारी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली..
नांदेड परिक्षेत्र तिसऱ्या क्रीडा स्पर्धा सुरू असून या निमित्ताने हा सामना खेळविण्यात आला. या सामन्यात पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी , पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी, दिनकर डोंबाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, विवेकानंद पाटील, पोलीस निरीक्षक गणेश कदम, महादेव मांजरमकर ,सुरेश थोरात दीपक दंतुरकर, महेश लांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले, अनिल कुरुंदकर, जीवन राजगुरू, विश्वजीत कसले, यांनी पोलीस संघातून सामना खेळला. प्रथम फलंदाजी करीत पोलीस संघाने धावांचे आव्हान पत्रकार संघासमोर ठेवले.
याप्रसंगी महेश पांगरकर, आणि नवनाथ लोखंडे, यांनी पंच म्हणून काम पाहिले. रंजीत आगळे, गणेश कोटकर, यांनी सामन्याचे समालोचन केले. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी पत्रकार खेळाडूंचे स्वागत करीत गोलंदाजीसह फलंदाजी आणि समाजातून सामन्याला रंगत आणली पत्रकार खेळाडूंच्या संघात कर्णधार राजन मंगरूळकर, सुरज कदम, पंकज शिरसागर, धनाजी चव्हाण, प्रवीण चौधरी, नजीर खान, गणेश पांडे, विशाल माने, दिवाकर माने, मारुती झुंबडे, संतोष मगर, अर्जुन जाधव, विशाल शिंदे, यांचा समावेश होता. तर शेख मुबारक यांनी पोलिस आणि पत्रकार यांच्या सामन्याचे समलोचन केले यावेळी विष्णुशाही गुंडे यांच्यासह छायाचित्रकार उत्तम भोसरीकर उपस्थित होते









