शिक्षण व बांधकाम विभागात सावळा गोंधळ
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
मो: ८४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्हा परिषद मधील शिक्षण व बांधकाम विभागातील घोटाळ्याचे भांडा फोड २०/०१/२०२६ ला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक मा.बच्चू भाऊ कडू जाहिर करणार आहे.

रायगड जिल्ह्या मध्ये शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याची खात्रीलायक माहिती असून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ करुन त्यांचे भविष्य धोक्यात आणण्याचे काम सुरु आहे. काही अधिकारी व संस्थाचालक हे संगनमताने हे गैरप्रकार करीत आहे. व बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता तसेच उप अभियंता यांच्या भ्रष्टाचार व सुशिक्षित बेरोजगार अभियंते जे राजीप कडे नोंदणीकृत आहे यांची फसवणूक करून करीत असलेले भ्रष्टाचाराचे तसेच त्यामुळे याबाबत सविस्तर माहिती मा. मुख्यमंत्री व मा. शिक्षणमंत्री यांना भेटून हा भांडाफोड करून त्यांच्यावर कारवाई करून अधिकाऱ्यांना नोकरी वरुन बडतर्फ करणे आणि संस्थावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.
मागील ५-६ वर्षात रायगड जिल्ह्यातील शिक्षण विभागात व बांधकाम विभागात जो सावळा गोंधळ सुरू आहे. हा रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे जे जे अधिकारी आणि संस्था यात आहे याची माहिती दि.२०/०१/२०२६ ला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक मा.बच्चू भाऊ कडू जाहिर करणार आहे.
अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्ष चे रायगड जिल्हाधक्ष सचिन साळुंखे यांनी दिली.









