Home latest News अष्टविनायकातील मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक गणपती मंदिरे १० मे ते ०९ जूनपर्यंत...

अष्टविनायकातील मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक गणपती मंदिरे १० मे ते ०९ जूनपर्यंत भाविकांसाठी बंद

37

अलिबाग: मिळालेल्या माहितीनुसार वरील अष्टविनायक मंदिर काही कालावधी साठी भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासन आणि पुरातत्व विभागामार्फत अष्टविनायक मंदिराचे जतन, संवर्धन, व दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे.हे काम जलद गतीने, सुरक्षित पूर्ण होण्यासाठी सह धर्मदाय आयुक्त पुणे विभाग आदेशनुसार मंदिरे बंद ठेवण्यात येणार आहेत.

या दरम्यान भाविकांना मुख्य गाभाऱ्यात प्रत्यक्ष, दर्शन प्रवेश देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी तसेच यासाठी भाविकांनी, स्थानिक नागरिकांनी या काळात प्रशासनास मदत करण्याचे आवाहन केले आहे.

मंदिर दिनांक १० मे २०२६ ते ०९ जून २०२६ पर्यंत बंद राहतील यांची नोंद भाविकांनी घ्यावी व आपली गैरसोय होणार नाही यांची काळजी घ्यावी. मंदिर कमिटीस फोन करून आपण याबाबत अधिकची माहिती घ्या.