Home latest News शेतकरी कुटुंबातील श्रावणी पानसरे हिचे ९५.२०% गुणांसह SSC बोर्डात तालुक्यात अव्वल स्थान

शेतकरी कुटुंबातील श्रावणी पानसरे हिचे ९५.२०% गुणांसह SSC बोर्डात तालुक्यात अव्वल स्थान

14

जुन्नर :- तालुक्यातील शेतकरी दांपत्य उमेश सिताराम पानसरे यांची सुकन्या श्रावणी उमेश पानसरे हिने हिरा इंग्लिश मीडियम स्कूल जुन्नर येथून एसएससी बोर्डात घवघवीत ९५ . २०टक्के गुण प्राप्त करून तालुक्यात टॉपरमध्ये नाव झळकवले आहे.

यामुळे तालुक्यात सर्वत्र तिचे कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. टॉपर श्रावणीच्या यशात तिला मोलाचे मार्गदर्शन जयश्री दशरथ काशीद आणि अनुपमा संतोष घोगरे यांनी केले असल्याचे श्रावणी हिने सांगितले.

श्रावणीचे आई-वडील संपूर्ण दिवस शेतात राखतात यांची जाणीव ठेवून तिने बोर्डाच्या परीक्षेत अथक परिश्रम घेतले आणि उत्तीर्ण झाली. यामुळे कालेगावातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेऊन उत्तीर्ण होणे ही काले गावाच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. असे सरपंच कुलदीप नायकवडी यांनी सांगितले. तसेच श्रावणीच्या या यशामुळे तालुक्यात विविध ठिकाणी तिचे सत्कार सोहळे होत आहेत असे तिचे वडील उमेश पानसरे यांनी सांगितले.

प्रकाश सोनवणे