Home latest News श्री. महेश कवळे सर यांचा सर्वद फाउंडेशनकडुन सत्कार

श्री. महेश कवळे सर यांचा सर्वद फाउंडेशनकडुन सत्कार

39

साईनगर”मित्र मंडळाचे मितभाषिक आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व श्री.महेश कवळे सर यांचा “सर्वद फाउंडेशन” कडुन सत्कार

भागवत जाधव 

अलिबाग: चेंढरे पश्चिम विभागतील श्री.महेश कवळे सर हे मितभाषिक आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे ते एका शिक्षण विभागाच्या उच्चपदावर कार्यरत असुन त्यांच्या काम करण्याच्या शैली वरून शिक्षण विभागानं वेळोवेळी पदोन्नती दिली आहे.

त्यांची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी पाहून मुंबईतील “सर्वद फाउंडेशन” तर्फे डॉ. मिलिंद भोसुरे आणि ‘श्वास ‘ सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते अभिनेते श्री.अरुण नलावडे यांच्या हस्ते “सर्वद स्टार” पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम मुंबई- बोरिवली येथील ‘गर्जतो मराठी ‘ बँकेट् हॉलमध्ये नियोजनबद्द दिमाखदार सोहळा पार पडला.

एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि सर्वद संस्थेच्या संचालक डॉक्टर सुचिता पाटील यांनी सरांची संक्षिप्त ध्वनीचित्रफित तयार करून सोहळ्यात सादर केली कार्यक्रम यशस्वी पार होण्यासाठी धावपळ करणारा डॉक्टर देशमुख सारखा उच्चशिक्षित कार्यकर्ता सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता.

यावेळी इतर मान्यवर सोबत व्यासपीठावर श्री. महादेव रानडे श्री. मोहन सालेकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमास अंदाजे दोनशे पन्नास अधिक श्रोत्यांची उपस्थिती होती.