Home latest News जुन्नर शहराच्या नगराध्यक्ष सुजाता काजळे यांच्या पारदर्शक कारभारामुळे दैनंदिन बाजार भुईभाडे लिलाव...

जुन्नर शहराच्या नगराध्यक्ष सुजाता काजळे यांच्या पारदर्शक कारभारामुळे दैनंदिन बाजार भुईभाडे लिलाव ९०८००० रुपये…

35

जुन्नर:-शहराच्या नगराध्यक्ष सुजाता काजळे यांच्या कालावधीत जुन्नर शहरातील फेरीवाले, पथारी, हातगाडी वाले, यांच्याकडून दैनंदिन बाजार भोई भाडे फी वसुलीचा जाहीर लिलाव करण्यात आला.

त्यांच्या पारदर्शक कारभारामुळे न खाऊंगी, ना ना खाने दूंगी, या तत्त्वामुळे सदरच्या लिलावामध्ये जुन्नर नगरपालिकेच्या तिजोरी मध्ये मोठी भर पडली आहे. नागरिकांच्या हिताच्या कामासाठी दोन लाख आठ हजार रुपयांची जास्तीची भर पडली आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मागच्या वर्षी हा लिलाव फक्त ७०००००/सात लाख रुपयांना गेला होता. त्याची मुदत संपल्यानंतर नगरपालिका कर्मचारी दैनंदिन भोईबाडे गोळा करीत असताना नगरपालिकेच्या तिजोरी केवळ दररोज 700 ते १००० रुपये अशी तुटपुंजी रक्कम भरणा करीत होते.

ही बाब नगराध्यक्ष सुजाता काजळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या पारदर्शक कारभारामुळे हाच लिलाव नऊ लाख 8 हजार रुपयावर गेल्यामुळे नगरपालिकेच्या तिजोरी मध्ये मोठी भर पडून आजच्या या लिलावामध्ये मोठा फायदा झालेला आहे. अशी माहिती नगराध्यक्ष सुजाता काजळे यांनी दिली.