Home latest News गोरेगावमध्ये मिडियावार्ताच्या बातमीचा IMPACT: महावितरणचे कर्मचारी अखेर सोलर ऊर्जा तपासणीसाठी घटनास्थळी दाखल

गोरेगावमध्ये मिडियावार्ताच्या बातमीचा IMPACT: महावितरणचे कर्मचारी अखेर सोलर ऊर्जा तपासणीसाठी घटनास्थळी दाखल

54

मिडियावार्ताच्या बातमीचा IMPACT: महावितरण चे कर्मचारी अखेर चौकशीसाठी सोलर ऊर्जा ची तपासणीसाठी घटनास्थळी दाखल.

संजय घासले

गोरेगाव: गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुका अंतर्गत कटंगी मध्यम प्रकल्पच्या बुडीत क्षेत्रात काही शेतकरी मध्यम पाटबंधारे विभागाची कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीर प्रकल्पाचे पाणी चोरी करून धनाचे रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत आहेत. याशिवाय महावितरण विभागाची फसवणूक व दिशाभूल करून स्वतःच्या शेतजमीनीत सोलर ऊर्जा न लावता कटंगी मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात सोलर ऊर्जा लावून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी करून धानाचे उत्पन्न घेणाऱ्या त्या बेजबाबदार व मुजोर शेतकऱ्यांवर कार्यवाही करा अशी तक्रार पाथरी येथील भोजराज गजानन कटरे यांनी महावितरण आणि मध्यम पाटबंधारे विभागाला केली होती व ही माहिती दैनिक मीडियाला बातमी प्रकाशित करण्यासाठी दिली होती.

दैनिक मीडिया वार्ता न्यूज ला बातमी प्रकाशित होताच याची दखल महावितरण ने घेऊन आज दिनांक 20 मे ला दुपारी बारावाजे दरम्यान आपली चमूसह प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात सोलर ऊर्जाच्या चौकशीसाठी घटनास्थळी दाखल झाले. अचानक टाकलेल्या महावितरण विभागाच्या धाडीत बेकायदेशीर सोलर ऊर्जा लावणारे शेतकरी यांच्यात धास्ती भरली तर एका युवा शेतकऱ्याने थेट कटकवार नावाच्या महावितरणच्या अधिकाऱ्यावर “मी आपला नाव सांगत नाही, इतर शेतकरी सोलर ऊर्जा छत्री काढतील तरच मी काढिन अन्यथा लावलेली सोलर ऊर्जा मी काढणार नाही अशी धमकी व मुजोरी दाखवली. यावेळी बेकायदेशीर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात सोलर ऊर्जा लावणारे शेतकरी एकत्र आले होते.

यावेळी तक्रारदार भोजराज कटरे यासह महावितरणच्या तीन महिला कर्मचाऱ्यासह कटकवार हे अधिकारी होते याप्रसंगी दैनिक मीडिया वार्ता चे तालुका प्रतिनिधी संजय घासले हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.

आज झालेल्या महावितरणच्या चौकशीत महावितरण ची फसवणूक व दिशाभूल करणाऱ्या व बेकायदेशीर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात सोलर ऊर्जा लावणाऱ्या मजूर शेतकऱ्यावर महावितरण कोणती कार्यवाही करणार याकडे संपूर्ण जिल्हा वाशियांचे लक्ष वेधून आहे की आज पर्यंत ज्याप्रमाणे महावितरणचे अधिकारी धृतराष्ट्राच्या भूमिकेत होते यापुढेही तसेच राहणार काय याकडेही नागरिकांचे लक्ष लागून आहे.