Home latest News उमरेड-भिवापूर मार्गावर मालवाहू ट्रकला भीषण आग..!

उमरेड-भिवापूर मार्गावर मालवाहू ट्रकला भीषण आग..!

28

त्रिशा राऊत 

उमरेड : आज (ता.२०) बुधवार रोजी पहाटे साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान उमरेड-भिवापूर मार्गावर एका मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. ट्रकमध्ये विविध प्रकारचा माल भरलेला होता. आग लागल्याची माहिती मिळताच उमरेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र ट्रकमधील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, उमरेड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक नियंत्रण करत परिस्थिती हाताळली.‼️🙏🏻