Home latest News तालुका संघटक कृष्णा म्हात्रे यांच्या सह असंख्य कार्यकर्त्याचा शिवसेनेत पक्ष प्रवेश

तालुका संघटक कृष्णा म्हात्रे यांच्या सह असंख्य कार्यकर्त्याचा शिवसेनेत पक्ष प्रवेश

97

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का..

 संतोष उध्दरकर

म्हसळा: म्हसळा शहरात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी होत असतांना नुकतेच राष्ट्रवादीचे मोठे नेते महादेव पाटील यांनी आपल्या जिल्हा चिटणीस पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते त्यातच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे म्हसळा तालुका संघटक कृष्णा बाळा )म्हात्रे,गणेश वाजे यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी मंत्री भरतशेठ गोगावले, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, कोकण संपर्क प्रमुख अनिल नवगणे, नेते रविंद्र लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला,यावेळी पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची नावे काशिनाथ कांबळे, तुकाराम मेंदाडकर, जितेंद्र लोणशीकर, भालचंद्र लोणशिकर, सुर्याजी जाधव, महेश सुतार, नरेश साळवी, रघुनाथ पाटील, आदि कार्यकर्ते उपस्थित होते, हा पक्ष प्रवेश साळविंडे गण विभाग प्रमुख नामदेव घुमकर यांच्या विषेश प्रयत्नाने झाला असल्याचे सांगण्यात आले, या पक्षप्रवेशाने शिवसेनीची ताकद वाढली असल्याने पुढील येणारी ग्रामपंचायत निवडणुका लढविणे अधिक सोपे जाऊन आधिकाधिक ग्रामपंचायत जागा मिळावु शकु असे तालुका प्रमुख अमित महामुणकर यांनी ठाम विश्वास व्यक्त केला.

_____________________

आम्ही ती शिवसेना सोडुन मूळ शिवसेनेत आलो आहोत व इथे आम्हाला योग्य सन्मान व न्याय मिळेल तसेच पक्ष वाढीसाठी एकत्रीत काम करू तसेच मंत्री भरतशेठ यांनी आमच्यावर जो विश्वास दाखविला आहे त्या विश्वासाला साजेसे काम करू.

बाळकृष्ण म्हात्रे.

शिवसैनिक