Home latest News जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यावर अन्याय, गॅस एजन्सी मात्र मालामाल 

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यावर अन्याय, गॅस एजन्सी मात्र मालामाल 

270

प्रकाश सोनवणे

जुन्नर :- तालुक्यातील अनेक गावात रुपेश शहा गॅस एजन्सी मार्फत गेली अनेक वर्ष गॅस सिलेंडर गावोगावी पोहोचवण्याचे काम केले जात होते. मात्र आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तसेच गॅस पुरवठा सुरळीत सुरू असताना ही मुजोर शहा गॅस एजन्सी यांनी गेली तीन महिन्यापासून ग्रामीण भागातील गॅस सिलेंडर गाडी बंद केली आहे.

यामुळे अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. (आठवले) गटाकडून जिल्हाधिकारी, तहसीलदार, पुरवठा अधिकारी, स्थानिक पोलीस स्टेशन यांना गाडी सुरू करण्याबाबत लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संभाजी साळवे. जुन्नर तालुका अध्यक्ष पोपट राक्षे. उपाध्यक्ष सुरेश खरात. सोमनाथ शिंदे यांनी सह्या केल्या आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या गॅस एजन्सी बाबत वेळप्रसंगी आम्ही तीव्र आंदोलन उभे करू असे संभाजी साळवे व पोपट् राक्षे यांनी सांगितले.

येणे रे. काले. निरगुडे. तांबे. काटेडे. चिंचोली. पारुंडे. दातखिळ वाडी. तांबे. बेलसर. सोनावळे. कालदरे. उस्थळ. आपटाळे. खानगाव. आमलेवाडी. घाटघर. आंबोली. अंजनावळे. आंबे हातवीज. आदी अनेक गावात गॅस पुरवठा गाडी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या असंतोषाचा कधीही स्फोट होऊ शकतो. याची जाणीव एजन्सीने घेतली पाहिजे.

दहा किलोमीटर अंतरावर सिलेंडर पोहोच करण्यासाठी एजन्सीला प्रति सिलेंडर 20 रुपये खर्च येतो. दररोज वरील ग्रामीण भागात 250 ते 300 सिलेंडरचा पुरवठा केला जात होता. म्हणजे तीन महिन्यात हजारो रुपये गॅस एजन्सी चे बचत झाले आहेत. दररोज सकाळी सहा वाजेपासून शेतकरी एजन्सीच्या दुकानासमोर लाईन लावून सिलेंडर घेतात व आपल्या दुचाकी गाडीवर बांधून घेऊन जातात . ही भयानक परिस्थिती आहे. भविष्यात एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर एजन्सीने दिले पाहिजे.

या संदर्भात येणेरे गावचे सरपंच अमोल भुजबळ यांच्याशी संपर्क करून चर्चा केली असता त्यांनी सांगितले की एजन्सीने मला सांगितले 31 ते 40 बुकिंग गावात झाली असेल तर मी गाडी पाठवतो. व सर्व जबाबदारी तुम्ही घ्या. भुजबळांनी सांगितले की एजन्सी त्यांचे काम आमच्या माथ्यावर मारून मोकळे होत आहेत. ग्रामस्थांचा रोष कोण ओढवून घेणार आम्हाला ग्रामपंचायतीचे अनेक कामे असतात असे अमोल भुजबळ यांनी सांगितले.

यासंदर्भात जुन्नर तालुक्याचे पुरवठा अधिकारी श्री कुलकर्णी यांच्याशी फोनवर गुरुवारी संपर्क साधून तक्रार केली असता त्यांनी सांगितले की मी ताबडतोब शहा एजन्सीला फोन करून विचारतो मला अद्या प पर्यंत ही गोष्ट माहित नाही परंतु पुरवठा अधिकाऱ्यांनी अद्याप पर्यंत दैनिक मीडिया वार्ताला काही प्रतिक्रिया दिली नाही.