वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अजय कुकडकर यांचा गौरव करण्यात आला
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून वनविभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यामध्ये वन्यजीव संरक्षण व संवर्धनात चांगले काम केल्यामुळे जलद बचाव दल सदस्य अजय कुकडकर यांचा मुख्य वन संरक्षक रमेश कुमार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याकरिता जलद बचाव दल सदस्य हे नेहमी तत्पर असतात. तसेच मानव – वन्यजीव संघर्ष कसा कमी करता या कडे लक्ष देत असतात. दोन वर्षा अगोदर स्थापन केलेल्या आर आर टी मध्ये मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांचे आभार मानतो व नेहमी तत्परते कार्य करत राहणार या वेळी मिलिश शर्मा उपवनसंरक्षक गडचिरोली, साईनाथ नरोड विभागीय वन अधिकारी ( प्लॅन ), गणेश झोळे विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण), प्रवीण पाटील सहाय्यक वनसंरक्षक तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.









