राष्ट्रीय महामार्ग (53) वरील देवरीतील मरामजोब येथे अपघात – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या रुग्णवाहिकेची तात्काळ मदत
देवरी: सुमरे 08:00 वाजण्याच्या सुमारास नागपूर – रायपूर राष्ट्रीय महामार्ग (53) वरील देवरीतील ( मरामजोब ) येथे अपघात घडला.
या अपघातात *1) दशरथ बुदरू कुंभरे (वय 65 वर्षे, रा. पिंडकेपार , ता. देवरी, जि. गोंदिया ),2) देवदास दादुजी सोनुले (वय 45 वर्षे, रा. मरामजोब , ता. देवरी, जि. गोंदिया )* हे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालय देवरी येथून 24 तास सेवा देणारी मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या या सेवेमार्फत जखमीस तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली.
रुग्णवाहिकेद्वारे जखमीस देवरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे जखमीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास मदत झाली आहे.
सदर रुग्णवाहिकेचे चालक गिरीष सु. साठवणे यांनी तत्परतेने सेवा बजावत जखमीस सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचविले. या तातडीच्या आणि निःस्वार्थ सेवेमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









