Home latest News अनोळखी मृतदेह आढळला: ओळखणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन

अनोळखी मृतदेह आढळला: ओळखणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन

117

अनोळखी मृतदेह आढळला: ओळखणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन

✍️अनिता हातेकर✍️
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
मो 8459775380

बुलडाणा :- बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देऊळघाट टोलनाका येथे अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या मृत इसमास ओळखणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी नामे डॉ शेख युनुस तर्फे कक्ष सेवक विनोद सतीष ढोरमारे (वय २९ वर्ष) रा. बुलडाणा यांचे रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन बुलडाणा (ग्रा) येथे मर्ग दाखल केले आहे. त्यामध्ये एक अनोळखी मृतकाच्या अंगामध्ये राखाडी रंगाचे आडव्या लाइनचे कॉलरचे टि शर्ट, राखाड्या रंगाचे हाफ पँट, विटकरी रंगाचे निकर असून मृतकाची दाढी, मिशी तसेच डोक्यावरील केस वाढलेले, डाव्या पायावर गुडघ्याचे खाली जुन्या जखमाचा पांढरा छोटा व्रण, उंची अंदाजे ५.५ फुट उंची असलेला अनोळखी इसमाचा मृतदेह मिळुन आलेला आहे. या वर्णनाचा इसम पोलीस स्टेशन हद्दीतून हरवीला किंवा कोणी या इसमास ओळखत असल्यास पोलीस स्टेशन, बुलढाणा (ग्रा) येथे संपर्क साधावा.

तसेच बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ०७२६२-२४१२५५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा पोलीस उपनिरीक्षक गोकुळसिंग राठोड यांना ९७६५४८६६१४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.