Home मुंबई दलितांच्या हिंसेला सरकार जबाबदारः आंबेडकर

दलितांच्या हिंसेला सरकार जबाबदारः आंबेडकर

61

 

पुणेः

भारत बंदमध्ये उसळलेल्या दलितांच्या हिंसक आंदोलनाला केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसंच सरकराने वेळीच कारवाई केली असती तर हिंसाचाराच्या घटना रोखता आल्या असत्या, असंही आंबेडकर म्हणाले.

‘भारत बंदचे आवाहन कुणी केली हे माहित नाही. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून हे पसरले. सरकारने वेळीच याची गंभीर दखल घ्यायला हवी होती. पण त्याकडे दुर्लक्ष केलं’, असं आंबेडकरांनी सांगितलं. भारत बंददरम्यान विविध राज्यांमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनात ९ जण ठार तर अनेक जण जखमी झालेत.

पश्चिम बंगाल आणि बिहरामधील जातीय दंगलीवरूनही आंबेडकरांनी केंद्र सरकारवर टीका केली. ‘सत्ताधारी भाजपला लोकशाही सरकार नको आहे. हे सरकार जातीयवादी आहे. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही खोटारड्यांची संघटना आहे. मतदारांमध्ये फूट पाडण्याचं काम संघ करतंय’, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.