Home latest News ♦️रक्षकच बनला भक्षक♦️ महिलेवर अत्याचार करणारा पोलिस हवालदार अटकेत

♦️रक्षकच बनला भक्षक♦️ महिलेवर अत्याचार करणारा पोलिस हवालदार अटकेत

96

♦️रक्षकच बनला भक्षक♦️
महिलेवर अत्याचार करणारा पोलिस हवालदार अटकेत

♦️रक्षकच बनला भक्षक♦️ महिलेवर अत्याचार करणारा पोलिस हवालदार अटकेत

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर, 3 एप्रिल
पतीला खूनाच्या बनावट गुन्ह्यात अडविण्याची धमकी देवून पोलिसाने महानगरातील एका महिलेवर अत्याचार केला. पिडितेच्या तक्रारीवरून मंगळवार, 2 एप्रिल रोजी रात्री उशिरा रामनगर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत एका पोलिस हवालदाराविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
संजय आतकुलवार असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. महानगरातील चंद्रपूर-बल्लारपूर वळण मार्गावरील एका वस्तीत राहणार्‍या व्यक्तीला खुनाच्या खोट्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी त्या पोलिसाने दिली आणि अत्याचार केला. प्रारंभी पोलिसांनी बर्‍याच कालावधीपर्यंत पिडितेची तक्रार स्वीकारली नाही. अखेर याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिली. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांनी रामनगर पोलिस ठाणे गाठले. पिडितेची हकीकत ऐकली. रात्री उशिरा याप्रकरणी भादंवी 376(2),अ,(1), 354, 450 कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. घटनेचा तपास रामनगर पोलिस करीत आहेत.