Home latest News निकाल लांबणीवर पडल्याने उमेदवारांमध्ये नाराजी

निकाल लांबणीवर पडल्याने उमेदवारांमध्ये नाराजी

48

समर्थकांची धाकधूक वाढली…

अँड.रत्नाकर पाटील

रायगड ब्युरो चीफ

मो: ९४२९३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्‍ह्यातील दहा नगरपालिकांच्‍या सार्वत्रिक निवडणूकीसाठी २डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. परंतु ३डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी पुढे ढकलल्‍याने उमेदवार आणि त्‍यांच्‍या समर्थकांची धाकधूक वाढली आहे. सर्व नगरपालिकांची मतमोजणी आता 21 डिसेंबर रोजी होणार असल्‍याने निकालासाठी तब्‍बल 19 दिवस वाट पहावी लागणार आहे. या निर्णयाबाबत उमेदवारांमध्ये नाराजीचा सुरू आहे.

नगरपालिका निवडणूकीसाठी मतदान झाल्‍यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मतमोजणी होवून निकाल जाहीर केला जाणार होता. परंतु मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपीठात यासंदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्‍यान आज मतदान झालेल्‍या आणि 20 नोव्‍हेंबर रोजी होणारया मतदानाची मतमोजणी एकाच दिवशी म्‍हणजे 21 डिसेंबर रोजी घ्‍यावी असे निर्देश न्‍यायालयाने दिल्‍याने उमेदवार आणि कार्यकर्त्‍यांचा हिरमोड झाला आहे.

अनेक उमेदवारांनी आणि त्‍यांच्‍या समर्थकांनी याबाबत नाराजी व्‍यक्‍त केली. ज्‍या उमेदवार आणि त्‍यांच्‍या समर्थकांना विजयाची खात्री आहे त्‍यांनी विजयी जल्‍लोषाची तयारी केली होती. याचे नियोजन बरेच दिव आधीपासूनच सुरू होते. गुलाल, वाद्यपथक यांची अगोदरच ऑर्डर दिली होती. त्‍यासाठी आज सकाळपासूनच उमेदवारांचे कार्यकर्ते मतदानासाठी मतदारांना बाहेर काढत होते. सर्वत्र उत्‍साहाचे वातावरण होते आणि अचानक न्‍यायालयाचा निर्णय येवून धडकला. मतमोजणी पुढे ढकलली गेल्‍याची चर्चा सुरू झाली. न्‍यायालयाच्‍या निर्णयाने त्‍यांच्‍या आनंद साजरा करण्‍याच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या इच्‍छेवर पाणी पडले.

ज्‍या नगरपालिकांसाठी मतदान झाले त्‍यांची मतमोजणी 21 नोव्‍हेंबर रोजी होणार आहे. म्‍हणजे निकालासाठी 19 दिवस वाट पहावी लागणार आहे. हा कालावधी खूप मोठा आहे. एवढे दिवस उत्‍सुकता ताणली जाणार आहे. राजकीय पक्षांचे नेते, उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्‍या मनावर मतमोजणी आणि निकालाचे दडपण राहणार आहे. एकदा का मतमोजणी होवून निकाल लागून गेला असता तर आम्‍ही पण मोकळे झालो असतो अशी कार्यकर्त्‍यांची भावना आहे. निकाल लांबणीवर पडल्‍याने त्‍यांच्‍यामध्‍ये निराशेचे वातावरण आहे.

ज्या ठिकाणी कुठलीही निवडणूक पुढे ढकलण्यात आली नव्हती तिथे मतमोजणी उद्याच व्हायला हवी होती. – प्रशांत नाईक, शेकाप नेते अलिबाग