Home latest News माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसा निमित्य होणाऱ्या मेळाव्याच्या बॅनरवर शिवसेना नेत्यांचा...

माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसा निमित्य होणाऱ्या मेळाव्याच्या बॅनरवर शिवसेना नेत्यांचा विसर

112

कोरपणा तालुका प्रतिनिधी मनोज गोरे
मो.9923358970

कोरपना :- कोरपणा तालुक्यात होत असलेल्या महिला मेळावा व शेतकरी मेळावा पाच सप्टेंबरला माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक गाव खेड्यात बॅनर लावण्यात आलेत त्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिवसेना पक्ष यांनी नुकताच माझी लाडकी बहीण योजना सुरू केली त्या योजनेचा प्रचार त्या बॅनरच्या माध्यमातून केला जात आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाचे नेत्यांच्या बॅनर वर फोटोचा विसर पडला आहे. शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख राकेश राठोड शिंदे गटाचे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहे. अनेक योजना शिवसेना पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी अमलात आणल्या भाजप पक्ष या योजनेचा गाव खेड्यात मोठ्या प्रमाणात प्रचार करीत आहेत मात्र शिवसेना पक्षाच्या नेत्यांनाच बॅनरवर फोटोचा विसर पडल्याचे दिसते त्यामुळे अनेक शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर पाहावयास मिळत आहे. अशी प्रतिक्रिया राकेश राठोड यांनी प्रतिनिधी ना दिली