Home latest News काँग्रेसचे नेते नाथसिंह देशमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसचे नेते नाथसिंह देशमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश

204

सांस्कृतिक कार्यमंत्री ना. आशिषजी शेलार आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न

लातूर: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष नाथसिंह देशमुख आणि रवींद्र काळदाते यांच्यासह इतर अनेकांनी राज्याचे संस्कृती कार्यमंत्री ना आशिषजी शेलार आणि भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत सोमवारी भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे तोंडावर येऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना आशिषजी शेलार यांनी सोमवारी सायंकाळी एमआयटी परिसरातील प्रयाग या भाजप नेते आ रमेशआप्पा कराड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी लातूर ग्रामीण मतदार संघाच्या वतीने मंत्री महोदयांचा यथोचित सत्कार करून आ कराड यांनी स्वागत केले. यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष नाथसिंह देशमुख आणि रवींद्र काळदाते यांच्यासह इतर अनेकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला लातूर ग्रामीण मतदार संघातील गावागावातील वाडी वस्तीतील काँग्रेस व इतर पक्षातील अनेक जण सातत्याने आ कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहे.

नाथसिंह देशमुख यांच्या या भाजपा पक्ष प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणुक निमित्ताने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ना. शेलार आणि आ. कराड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक निमित्ताने तसेच लातूर ग्रामीण मतदार संघातील विविध तीर्थक्षेत्र व इतर विकास कामाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली.

यावेळी संत गोपाळ बुवा महाराज साखर कारखान्याचे चेअरमन राजेश कराड भाजपाचे अजित पाटील कव्हेकर विक्रमकाका शिंदे सुरज शिंदे महेंद्र गोडभरले उद्धव काळे प्रताप पाटील शरद दरेकर अनिल भिसे पद्माकर चिंचोलकर गणेश मद्दे नागेश पाटील सौदागर पवार उमेश काळदाते पंडित सूर्यवंशी अभंग चव्हाण सिद्राम शिंदे काशिनाथ कांबळे दशरथ सरवदे बन्सी भिस साहेबराव मुळे श्याम वाघमारे अमर चव्हाण गोपाळ पाटील विजय चव्हाण बालाजी शिंदे लक्ष्मण यादव चंद्रकांत वागस्कर संजय डोंगरे राम भताने भैरवनाथ पिसाळ बाबा भिसे महेश गाडे रवींद्र नागरगोजे पांडुरंग बालवाड मारुती शिंदे हनुमंत गव्हाणे माधव घुले आदिनाथ मुळे संजय ठाकूर सोमनाथ वाघमारे महादेव गुरुशेट्टे किशोर गुट्टे ज्ञानेश्वर जुगल परमसिंह देशमुख बाबुराव कस्तुरे निवृत्ती लहाने अच्युत कातळे दत्ता सरवदे शेख अजीम बालाजी गवळी श्रीमंत नागरगोजे भुजंग काळदाते वैजनाथ लहाने शिवरुद्र संडे नरसिंग येलगटे संतोष राठोड दीपक बनसोडे पद्माकर होळकर यांच्यासह लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.