Home latest News महाराष्ट्र विरुद्ध ओडिसा कूच बिहार ट्रॉफी,क्रिकेट सामन्यासाठी रिलायन्स नागोठणेचे मैदान सज्ज..!

महाराष्ट्र विरुद्ध ओडिसा कूच बिहार ट्रॉफी,क्रिकेट सामन्यासाठी रिलायन्स नागोठणेचे मैदान सज्ज..!

112

महाराष्ट्र विरुद्ध ओडिसा कूच बिहार ट्रॉफी,क्रिकेट सामन्यासाठी रिलायन्स नागोठणेचे मैदान सज्ज..!

अँड.रत्नाकर पाटील

रायगड ब्युरो चीफ

९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि सुसज्ज असलेल्या नागोठणे येथील रिलायन्स क्रिकेट मैदानावर दि.१६ ते १९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विरुद्ध ओडिसा ह्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या कूच बिहार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामना होत आहे,ह्या सामन्यासाठी रिलायन्स नागोठणे विभाग व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन पूर्णपणे सज्ज असल्याचे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव जयंत नाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.रिलायन्सच्या मैदानावर ह्या पूर्वी देखील रणजी करंडक व कूच बिहार ट्रॉफीचे सामने तसेच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआई)आयोजित विविध स्पर्धेतील सामन्यांचे यशस्वी रित्या आयोजन करण्यात आले आहे.

रिलायन्स स्टेडियम,हिरवेगार मैदान,उत्तम दर्जाची खेळपट्टी,खेळाडूंची निवास व्यवस्था तेथील सुरक्षा व्यवस्था व एकूणच सर्व आयोजन रिलायन्स नागोठणे विभागा तर्फे उत्तम दर्जाचे असते,तसा अहवाल बीसीसीआय कडे गेल्या काही वर्षांत गेला असल्याने रिलायन्सचे मैदान प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धांसाठी मान्यताप्राप्त असल्याचे जयंत नाईक यांनी सांगितले. ह्या सामन्याचे नियोजन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ,रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन व रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे विभाग यांच्या वतीने करण्यात येणार आहे.ह्या सर्व सुविधा प्राप्त असलेल्या मैदानावर भविष्यात देखील अनेक सामने होणार आहेत. हा सामना प्रेक्षकांना पाहण्यासाठी मोफत असणार आहे,अश्या सामन्यातून रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळेल व भविष्यात रायगड जिल्ह्यातून होतकरू खेळाडू तयार होतील अशी आशा जयंत नाईक ह्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

सामन्याची पूर्व तयारी पाहणी करण्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव जयंत नाईक,सदस्य ॲड.पंकज पंडित,शंकर दळवी,संदीप जोशी,रिलायन्स हॉर्टिकल्चर विभागाचे प्रमुख शरद पवार,मैदानाचे कंत्राटदार संतोष कोठे,खेळपट्टी क्युरेटर कुमार पिंगळस्कर,संदेश पाटील,अजय वाघमारे उपस्थित होते.