Home मुंबई सलमान तुरुंगात; ‘ही’ अभिनेत्री झाली खूश

सलमान तुरुंगात; ‘ही’ अभिनेत्री झाली खूश

78

 

मुंबई:

काळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान तुरुंगात गेल्यानं ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धकसोफिया हयात भलतीच खूश झाली आहे. तिनं सोशल मीडियावर सलमानच्या फोटोसह पोस्ट शेअर करून आनंद व्यक्त केला आहे.

‘अखेर कर्माची फळं भोगायला लागतातच. सगळ्यांना वाटतंय की बॉलिवूड इंडस्ट्री सलमानच्या ताब्यात आहे. त्यामुळे ते त्याच्याविरोधात बोलण्यास घाबरतात. पण मी त्याला घाबरत नाही. सलमाननं जे कृत्य केलंय, त्यासाठी त्याला तुरुंगात जावं लागलं. त्यामुळं मी खूप खूश आहे. या पृथ्वीवर प्राण्यांची खूप आवश्यकता आहे. सलमाननं असं वाईट कृत्य करून केवळ स्वतःचाच विचार केला. सलमानला अनेक तरुण मुलं फॉलो करतात. असं कृत्य करून तो काय सिद्ध करू पाहतो. सेलिब्रिटी असल्यानं कायदा पायदळी तुडवणं आणि प्राण्यांना मारून स्वतःला वाचवणं योग्य वाटतं का? हीच शिकवण तो तरुणांना देतोय का,’ असा सवालही तिनं केला आहे.