Home latest News समुद्रपूर ग्रामपंचायत सदस्याच्या पतीवर प्राणघातक हल्ला.

समुद्रपूर ग्रामपंचायत सदस्याच्या पतीवर प्राणघातक हल्ला.

89

समुद्रपूर ग्रामपंचायत सदस्याच्या पतीवर प्राणघातक हल्ला.

समुद्रपूर तालुक्यातील मेंदूला येथील ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या पतीसोबत वॉर्डातील विकास कामाच्या मुद्यावरून वाद घालून युवकाने स्क्रू ड्रायव्हरने प्राणघातक हल्ला केला.

 प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी 

समुद्रपूर :- समुद्रपूर तालुक्यातील मेंदूला येथील ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या पतीसोबत वॉर्डातील विकास कामाच्या मुद्यावरून वाद घालून युवकाने स्क्रू ड्रायव्हरने प्राणघातक हल्ला केला. यात दिनेश इटनकर हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून समुद्रपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे . प्रतीक वरघणे असे आरोपीचे नाव आहे .

मेंदूला येथील ग्रामपंचायत सदस्याचे पती दिनेश इटनकर हे रस्त्याने जात असताना आरोपी प्रतीक वरघने याने गावातील कामांवरून त्यांच्याशी वाद घातला . या वादात झालेल्या शाब्दिक चकमकीतून प्रतीकने त्याच्याकडे असलेल्या स्क्रू ड्रायव्हरने डोक्यावर वार केले . यात ते जखमी झाले . त्यांना समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमोपचार करून सेवाग्राम येथे दाखल करण्यात आले . समुद्रपूर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा नोंद करून आरोपी प्रतीक वरघणे याला अटक केली . सदर घटनेसंदर्भात समुद्रपूरचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस तपास करीत आहेत .