Home latest News अकोला 510 अहवाल प्राप्त, 27 पॉझिटीव्ह, 308 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू.

अकोला 510 अहवाल प्राप्त, 27 पॉझिटीव्ह, 308 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू.

78

अकोला 510 अहवाल प्राप्त, 27 पॉझिटीव्ह, 308 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू.

अकोला 510 अहवाल प्राप्त, 27 पॉझिटीव्ह, 308 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू.
अकोला 510 अहवाल प्राप्त, 27 पॉझिटीव्ह, 308 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू.

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
अकोला,दि.7(जिमाका):आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 510 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 483 अहवाल निगेटीव्ह तर 27 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 308 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.6) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 56704(42560+13967+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 27 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 15= एकूण पॉझिटीव्ह- 42.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 277629 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 274380 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2859 नमुने होते. आजपर्यंत एकूण 277495 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 234935 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

27 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 27 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 13 महिला व 14 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- अकोट-तीन, पातूर-नऊ, अकोला-15. (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-14), दरम्यान काल (दि.6) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

308 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 17, युनिक हॉस्पीटल येथील एक, पिकेव्ही जम्बो हॉस्पीटल येथील एक, समर्पण हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, केअर हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील एक, लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 270 असे एकूण 308 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

आज दिवसभरात दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात सांगळूद बोरगाव मंजू येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 1 जून रोजी दाखल झाले होते. तर गडंकी येथील 59 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 5 जून रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

2508 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 56704(42560+13967+177) आहे. त्यात 1104 मृत झाले आहेत. तर 53092 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 2508 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.