Home latest News गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे ७१ व्या वर्षी हृदयविकाराने निधन
गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे ७१ व्या वर्षी हृदयविकाराने निधन
भागवत जाधव
अलिबाग
८८०५०२२५६५
अलिबाग :- सुलक्षणा पंडित यांच्या जीवनाविषयी थोडी माहिती जाणून घेऊयात सुलक्षणा पंडित यांचा जन्म १२ जुलै १९५४ रायगड छत्तीसगड येथे झाला होता या एक भारतीय पार्श्वगायिका आणि अभिनेत्री होत्या ज्यांनी १९७० आणि १९८० च्या दशकात हिंदी चित्रपट सृष्टीत काम केले.
संगीत वारसा आणि कारकीर्द:
त्यांचा जन्म संगीताची समृद्ध परंपरा असलेल्या कुटुंबात झाला होता त्या मेवात घराण्याची संबंधित होत्या. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज त्यांच्या कुटुंबातील सदस्य होते ते त्यांचे काका होते. संगीतकार जोडी जतीन ललित आणि अभिनेत्री विजयता पंडित या त्यांच्या धाकट्या बहिण भाऊ होत्या. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी आपल्या संगीतकार कारकिर्दीला सुरुवात केली. १९६७ मध्ये तकदीर चित्रपटातील तू ही सागर है तू ही किनारा या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला. त्यांनी टीचर कुमार मोहम्मद रफी यांच्यासारख्या दिग्गजा सोबतही गाणी गायली.
अभिनय कारकीर्द:
गाण्यासोबतच त्यांनी अभिनयातही आपले स्थान निर्माण केले १९७५ मध्ये उलझन या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाद्वारे त्यांनी संजीव कुमार यांच्यासोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी राजेश खन्ना जितेंद्र विनोद खन्ना शशी कपूर इत्यादी कलाकारांसोबत काम केले. संकल्प १९७६ हेराफेरी आपण खंडन चेहरे पे चेहरा धर्म कांडा आणि वक्त की दिवार हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत.
खासगी जीवन आणि संन्यास:
अभिनेता संजीव कुमार यांच्यावर त्यांचे एकतर्फी प्रेम होते संजीव कुमार यांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे त्यांनी कधीच लग्न केले नाही. एका दुर्दैवी योगाने त्यांचे निधनही सहा नोव्हेंबर रोजी झाले जी संजीव कुमार यांच्या निधनाची तारीख होती.