Home latest News आरडीसीए जिल्हास्तरीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पंचांना प्रमाणपत्रांचे वाटप.

आरडीसीए जिल्हास्तरीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पंचांना प्रमाणपत्रांचे वाटप.

282

आरडीसीए जिल्हास्तरीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पंचांना प्रमाणपत्रांचे वाटप.

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट पंचांसाठी १०० दिवसांचे ऑनलाइन व प्रत्येक्ष कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये करण्यात आले होते व त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींची परीक्षा घेण्यात आली होती,ह्या प्रशिक्षण शिरामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी माजी रणजीपट्टू व विद्यमान बीसीसीआयचे पंच हर्षद रावले,मुबई क्रिकेट असोसिएशनचे पंच राजन कसबे व रायगड जिल्ह्यातील क्रिकेट नियमांचे तज्ञ नयन कट्टा यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले,शिबिरासाठी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थीं यांना क्रिकेट संदर्भातले सर्व नियम,विविध क्रिकेट फॉरमॅट मधील प्लेइंग कंडीशनस तसेच क्रिकेट मधील नवीन अस्तित्वात आलेल्या नियमांची सखोल माहिती या शिबिरामध्ये देण्यात आली.प्रशिक्षण घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विविध भागातील ४२ पंचांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये महिला पंचांनी देखील उत्साहाने सहभाग घेतला होत.काल पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर,रायगड जिल्हास्तरीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व पंचांना आरडीसीएचे सरचिटणीस प्रदिप नाईक,उपाध्यक्ष राजेश पाटील,सहसचिव जयंत नाईक,सदस्य कौस्तुभ जोशी, एमसीए स्टेट पॅनल पंच ॲड.पंकज पंडित,प्रदिप खलाटे, आरडीसीएचे मुख्य प्रशिक्षक शंकर दळवी,एमसीएचे पंच प्रशांत माळी,सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच गतवर्षी एमसीएच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या पंच परीक्षेत रायगडची पहिली महिला पंच म्हणून उत्तीर्ण झालेल्या साची सुधीर बेलोसे हिचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.