Home latest News माणुसकीच्या धाग्याने जोडलेले नेरळ” — मुस्लिम समाजाने हिंदू मुलीसाठी केली मदत

माणुसकीच्या धाग्याने जोडलेले नेरळ” — मुस्लिम समाजाने हिंदू मुलीसाठी केली मदत

92

माणुसकीच्या धाग्याने जोडलेले नेरळ” — मुस्लिम समाजाने हिंदू मुलीसाठी केली मदत

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

नेरळ :- नेरळ गावातील टॅक्सी चालक प्रकाश अनंत लोभी यांच्या नववीत शिकणारी मुलगी कु. कनिष्का प्रकाश लोभी ही काही दिवसापूर्वी आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाली. या अपघातात कनिष्काच्या डोक्याला व पायाला मोठ्या प्रमाणात दुखापती झाल्या असून, तिच्यावर सध्या मुंबईच्या मुलुंड येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर स्थानिक परिसरातील रुग्णालयांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिल्याने, कुटुंबीयांनी तिला तातडीने मुंबईत हलवले. डॉक्टरांनी कनिष्काच्या उपचारासाठी काही लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले आहे. टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे प्रकाश लोभी यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलकी असल्याने त्यांच्या मुलीच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

या आवाहनाला स्थानिक समाज बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दामत येथील जामा मस्जिद समितीने १ लाख ६० हजार रुपये जमा करून दिले असून, नेरळ येथील मुस्लिम बांधवांनीही ५४,२६० रुपयांची मदत करून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले आहे.

प्रकाश लोभी यांनी कनिष्काच्या उपचारासाठी QR कोडद्वारे आर्थिक सहाय्य देण्याचे आवाहन केले असून, गावातील अनेक नागरिक, समाजसेवक व धर्मादाय संस्था या माध्यमातून मदतीचा हात पुढे करत आहेत. या घटनेने नेरळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कनिष्काच्या लवकर प्रकृती सुधारासाठी सर्वत्र प्रार्थना करण्यात येत आहे.