गोरे दत्ता
लातूर मुरुड प्रतिनिधी
दि.०८ रोजी चर्मकार व ढोर समाजाच्या स्मशानभूमीची महसूल अभिलेखात नोंद करून सदर जागा अधिकृतपणे समाजाच्या ताब्यात हस्तांतरित करण्याच्या मागणीसाठी आज मा जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे लातूर जिल्हाध्यक्ष मा रवि कुरिल सर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले याप्रसंगी महासंघाचे उप जिल्हाध्यक्ष राजेंद्र साबळे मुरूड शहर अध्यक्ष सुजित साबळे अशोकराव जाधव सर हनमंभिमराव वाघमारे बिभिषण शेरखाने मल्हारी साबळे विष्णूदास साबळे अतुल शेरखाने परमेश्वर साबळे पांडुरंग वाघमारे श्रीधर साबळे वैजेनाथ कांबळे शुभम साबळे रमाकांत कदम पिंटू सातपुते यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते
समाजाच्या अंत्यसंस्काराच्या मूलभूत हक्कासाठी ही जागा त्वरित अधिकृत करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.









