Home latest News मंगरुळपीर गरीबांच्या मुखातला घास हिरावुन, राशनचा तांदुळ खासगी गोडावूनमधून जप्त.

मंगरुळपीर गरीबांच्या मुखातला घास हिरावुन, राशनचा तांदुळ खासगी गोडावूनमधून जप्त.

80

मंगरुळपीर गरीबांच्या मुखातला घास हिरावुन, राशनचा तांदुळ खासगी गोडावूनमधून जप्त.

मंगरुळपीर :- जिल्ह्यात राशन गैरप्रकारासाठी  मंगरुळपीर तालुका नेहमीच चर्चेत असतो. अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा मंगरुळपीरचे तहसिलदार वैभव वाघमारे यांनी मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे एका खाजगी गोडावूनवर छापा टाकुन राशनचा तांदुळ आणी इतर राशनचा माल जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता  या मोठ्या कारवाईमुळे राशन तस्करांचे धाबे दणानले आहे.  तहसिलदार वैभव वाघमारे यांनी 7 जानेवारीच्या दुपारच्या सुमारास एका खाजगी गोडावूनवर राशनचा माल असल्याची माहीती मिळताच आपल्या निवडणुकीसारख्या महत्वाच्या व व्यस्ततेच्या कामातुनही लगेच वेळ काढून पोलिस ताफ्यासह व महसुल कर्मचारी व पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यासह त्या गोडावुनवर जावुन छापा टाकला. या कारवाइमुळे गरीबांच्या मुखातला घास हिरावुन घेणारांचे माञ चांगलेच धाबे दणाणले आहेत.