Home latest News धक्कादायक! पंधरा वर्षीय मुलगी गर्भवती, पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव येथील घटना

धक्कादायक! पंधरा वर्षीय मुलगी गर्भवती, पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव येथील घटना

86

धक्कादायक! पंधरा वर्षीय मुलगी गर्भवती, पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव येथील घटना

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो:  8830857351

पोंभुर्णा, 11 मार्च: तालुक्यातील जुनगाव येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मूल पोलिसांनी आरोपी लोकेश चुधरी (19) याच्याविरूध्द पोस्को कायद्यान्वे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथील इयत्ता नववीत शिकणार्‍या विद्यार्थिनीच्या पोटात अचानक दुखू लागले. तिची आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली. तपासणीत डॉक्टरांनी ती मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. हे ऐकूण पीडित मुलीचीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने मूल पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केले. पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, गावातीलच एका तरुणाने तिच्यासोबत अनेकवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. पीडितेच्या वक्तव्यानंतर पोलिसांनी आरोपी लोकेश चुधरी यांच्याविरूध्द भादंवि 376, पोक्सो बाल लैंगिक प्रतिबंधीत कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडितेसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याचे आरोपीचे म्हणणे आहे.

भ्रमणध्वनी आणि इंटरनेट ही सर्वात मोठी गरज आहे. मात्र अनेक वेळा तरुणांकडून चुकीची पावले उचलली जातात. अशा परिस्थितीत मुलांना योग्य माहिती देण्याची गरज आहे. जेणेकरून त्यांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर करता येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.