Home latest News बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मलकापूर येथे स्वाभिमान सप्ताह साजरा

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मलकापूर येथे स्वाभिमान सप्ताह साजरा

99

विविध कार्यक्रमाचे आयोजन करत वाढदिवस साजरा

 

मीडिया वार्ता न्यूज

११ मे, मलकापूर: 

बहुजन हृदयसम्राट,वंचितांचे कैवारी,वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मलकापूर तालुका, जिल्हा बुलडाणा यांच्या विद्यमाने “स्वाभिमान सप्ताह” साजरा करण्यात आलाा.

त्या अनुषंगाने दि.१० मे रोजी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप व गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तथा शासकीय विश्रामगृह येथे केक कापून ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या उंदंड आयुष्यासाठी मंगलकामना करण्यात आल्या.

याप्रसंगी बुलडाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, जी.संघटक भाऊराव उमाळे,जी.उपाध्यक्षा रेखाताई नीतोने,जेष्ठ नेते अनिल पाचपोळ, ता.उपाध्यक्ष गणेश सावळे,विलास तायडे,यासीनभाई कुरेशी,गजानन झनके,ता.महासचिव नरसिंग चव्हाण,शहराध्यक्ष विलास गुरव,महासचिव अतुल पाचपोळ,महीला शहर अध्यक्षा अलमनुरबी,तुळसाताई रायपुरे, जनार्दन इंगळे,अजय इंगळे,अमोल पाटील,प्रकाश उमाळे,योगेश वाघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.