आसराबारी येथे आदिवासीं दिनाचे औचित्य साधून आदिवासीं मुलांसाठी स्वखर्चातून शाळा

सुपडू संदानशिव
यावल तालुका प्रतिनिधी
📱9561200938📱
यावल तालुक्यातील डोंगर रांगेत वसलेले गाव,जे आसराबारी धरण (पाडा) म्हणून प्रख्यात आहे,त्या ठिकाणी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत गावातील आदिवासीं मुलांसाठी स्वखर्चातून भुसावळ येथील दांपत्याने *बिरसा मुंडा स्कुल* शाळा चालू केली आहे.
सदर वृत्त असे की,९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी बिरसा मुंडा स्कुल या नावाने शाळा चालू केली,आज सरकार स्वातंत्र्याचा ७५ वें अमृत महोत्सव मनवत आहे,मात्र आज देखील आपल्या देशात अनेक गावांमध्ये शाळाच नाहीत,त्याच प्रमाणे त्या शाळाच नव्हती, शिक्षणा पासून मुले वंचित राहू नये म्हणून मोहराळा येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश अडकमोल यांनी
भुसावळ येथील दांपत्य डॉ.दिगंबर खोब्रागडे व त्यांची पत्नी वंशिका खोब्रागडे यांच्याकडे विनंती केली की,शासन जोपर्यंत इथे काही प्रयोजन करत नाही तो पर्यंत या मुलांच्या आयुष्याचा विचार म्हणून यांना शिक्षण देवू व त्यांनी तो स्वखर्चातून प्रकल्प तयार केला.

९ ऑगस्ट रोजी आसराबारी येथे शाळेचे उद्घाटन स्वखर्चातून *बिरसा मुंडा स्कुल* या नावाने चालू करण्यात आली,सदर प्रसंगी भालोद कॉलेज चे प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे,वड्री येथील सरपंच अजय भालेराव, परसाडे येथील ग्रापंचायत सदस्य राजू तडवी,सामाजिक कार्यकर्ते सतीश अडकमोल,आसराबारी येथील मळू बारेला, जुवानशिंग बारेला,दिदास बारेला, व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.








