Home latest News बोरगाव येथे शाळा दुरुस्ती व संरक्षण भींत बांधकामाचे भुमीपुजन संपन्न जिल्हा...

बोरगाव येथे शाळा दुरुस्ती व संरक्षण भींत बांधकामाचे भुमीपुजन संपन्न जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य क्रिष्णा सहारे यांच्या हस्ते भूमिपूजन

74

बोरगाव येथे शाळा दुरुस्ती व संरक्षण भींत बांधकामाचे भुमीपुजन संपन्न

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य क्रिष्णा सहारे यांच्या हस्ते भूमिपूजन

बोरगाव येथे शाळा दुरुस्ती व संरक्षण भींत बांधकामाचे भुमीपुजन संपन्न जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य क्रिष्णा सहारे यांच्या हस्ते भूमिपूजन

✍क्रिष्णा वैद्य✍
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी:-
ब्रम्हपुरी तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागील भागाला संरक्षण भिंत नव्हती व काही वर्षापासून शाळेच्या इमारतींची डागडुजी करण्यात आली नव्हती. सदरची बाब ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच रुपेश मैंद यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य क्रिष्णा सहारे यांना कळवुन सदर कामाची मागणी केली.
तेव्हा जिल्हा परिषदेचे सदस्य क्रिष्णा सहारे यांनी विशेष प्रयत्न करून जिल्हा वार्षिक योजनेतून 14 लाख रुपयांच्या नीधीचे शाळा दुरुस्ती व संरक्षण भींत बांधकाम मंजूर करून घेतले.
सदर कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य क्रिष्णा सहारे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
यावेळी सदर कार्यक्रमाला ब्रम्हपुरी पं.स. सदस्या सौ. उर्मीलाताई धोटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य विलास उरकुडे, पं.स. सदस्या ममताताई कुंभारे, सामाजिक कार्यकर्ते सिध्देश्वर भर्रे, बोरगाव येथील सरपंच सौ. मेघाताई पिंपळकर, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच रुपेश मैंद, ग्राम.पं.सदस्य धनु तोंडरे, ग्राम.पं.सदस्या वैशालीताई ठाकरे, ग्राम.पं.सदस्या अर्चनाताई दोनाडकर, ग्राम.पं.सदस्या शितलताई दोनाडकर, ग्रामसेवक साधनाताई दिवटे, जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षाताई चिमुरकर, सौ.मरस्कोल्हे, रमेश तोंडरे, प्रभु भागडकर, ईश्वर मैंद, तंमुस अध्यक्ष पुंडलिक मातेरे, मन्साराम तोंडरे यांसह अन्य मान्यवर यांची यावेळी उपस्थिती होती.