*एक तास चाललेल्या थराराचा पोलिसांनी घटनास्थळीच बेड्या ठोकून केला अंत*
*_जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्या जागृकतेला पाहून सिंघम निलेश वाघमारे उपपोलीस निरीक्षक यांचे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत सहकार्य_*

*_जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्या जागृकतेला पाहून सिंघम निलेश वाघमारे उपपोलीस निरीक्षक यांचे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत सहकार्य_*
*कोरपणा तालुका प्रतिनिधी निखिल पिदूरकर 9067769906*
सविस्तर वृत्त असे की आज दिनांक:- ११/०९/२०२१ ला युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे हे राजुरा विधानसभेतील युवकांचा पक्ष प्रवेश घेऊन तथा नेहमीप्रमाणे थेट गावोगावी जाऊन जनतेच्या समस्यांचा आढावा घेऊन रात्री चंद्रपूर ला परत येत असताना बाबुपेठ येथील आंबेडकर चौक,
अशोका स्पोर्टिंग क्लब चंद्रपुर या
चौकामध्ये मुख्य मार्गांवर गुन्हेगारी वृत्तीचा *विक्रम टाक* नामक युवक आपल्या २-३ मित्रांसह रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या व्यक्तींवर त्यांच्या गाड्या थांबून त्यांच्यावर हल्ला करण्याकरिता त्यांच्या गाडीवर तलवारीचे वार करीत गाडीची काच फोडून त्यांना तलवारीचा व चाकूचा धाक/दम देत दरोडा टाकून पैसे लुटण्याचे काम करीत असतानाच हा थरारक प्रकार वेळ :- रात्री १०:१५ च्या सुमारास सर्रासपणे सुरू होता. तेथील परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच वेळी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष *श्री. सुरज ठाकरे* व सहकारी राहुल चव्हाण यांनी हा प्रकार पाहताच क्षणी दहशतखोरांची तक्रार चंद्रपूर पोलीस दलातील सिंघम *निलेश वाघमारे* ( पोलीस उपनिरीक्षक, सिटी पोलीस स्टेशन, चंद्रपूर ) यांना करताच त्यांनी आपल्या हद्दीची पर्वा न करता चंद्रपूर शहराला गुन्हेगारीमुक्त करण्याकरिता प्रामाणिक पणे आपले कर्तव्य बजावत तात्काळ घटनास्थळी पोहोचून आंबेडकर चौक, बाबुपेठ येथील अशोक स्पोर्टिंग क्लब येथे *पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघमारे* यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्यांसह सापळा रचून अखेर दहशतखोर विक्रम टाक या अट्टल गुन्हेगाराला व त्याच्या सहकाऱ्यांना घटनास्थळीच बेड्या ठोकून रामनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. धोबे साहेब यांच्या ताब्यात दिले. महत्त्वाचे म्हणजेच चंद्रपूर पोलीस दलातील सिंघम नीलेश वाघमारे यांनी जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्याशी परिचित असल्यामुळे त्यांच्या जागृकतेकडे पाहून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढू नये व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये हा दृष्टिकोन समोर ठेवून आपल्या अधिकार क्षेत्रातील हद्दीची पर्वा न करता गुन्हेगारीचा नायनाट व्हावा या उद्देशाने प्रामाणिकपणे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून आपले कर्तव्य बजाविले. *अशाच प्रकारे जर जिल्ह्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी लाच घूस न घेता व कोणते क्षेत्र कुणाच्या हद्दीत येते याची परवा न करिता गुन्हेगारीचा नायनाट लावून कायदा-सुव्यवस्था जर का राखून ठेवली तर भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यातील मंदिरातून चप्पलही चोरी जाऊ शकत नाही हे आज पोलीस उपनिरीक्षक *निलेश वाघमारे* यांनी सिद्ध केले. व यांच्यासह नेहमीच जागरूक असणारे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी या आदी देखील सतर्कता दाखवून चंद्रपूर शहरातील श्रमिक पत्रकार भवन समोर एक अज्ञात इसम बंदुकीने लोकांना धाक/दम दाखवत असतानाचा प्रकार गाडीमधून बघताच गाडी थांबवुन अज्ञात इसमाकडे धाव घेत त्याच्या हातातून बंदुक हिसकावून रामनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांना घटनास्थळी बोलावून दहशतखोराला त्यांच्या ताब्यात दिले होते. व आज देखील अशाच प्रकारे जागरुकता व सतर्कता दाखवीत चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता व लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये हा दृष्टिकोन समोर ठेवून स्वतःच्या जीवाची पर्वा न करिता गुन्हेगाराला पोलिसांच्या सहकार्याने चांगलीच अद्दल घडविली. व जनतेला उपदेश दिले की *गुन्हा करणाऱ्या पेक्षा गुन्हा सहन करणारा ही तितकाच गुन्हेगार असतो* घाबरून चालणार नाही आपले चंद्रपूर आपल्याला गुन्हेगारीमुक्त करायचे आहे. या गुन्हेगारांन विरोधात लढा आपल्यालाच द्यावा लागेल…
तेव्हाच आपल्या कुटुंबातील सदस्य वडील, आया-बहिणी, भाऊ, मुलं हे अशा गुन्हेगारांपासून सुरक्षित राहतील.🙏








