मुरुडेश्वर विध्यालय मुरुड येथे तंबाखू मुक्त अभियान उपक्रम
दत्ता गोरे
लातूर जिल्हा प्रतिनिधी
मुरुड: दि. 12 नोव्हेंबर 2025,बुधवार रोजी विध्यालयात तंबाखू मुक्त अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड मँडम यांचे स्वागत झाडके मँडम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
सहकारी येळगे मँडम यांचे स्वागत ही झाडके मँडम यांनीपुष्पगुच्छ देऊन केले.कार्यक्रम ची सुरुवात स्वागत गितांनी झाली.प्रस्ताविक विद्यालयातील शिक्षक श्री रमेश लाड सर यांनी केले.कार्यक्रम चे मार्गदर्शन करताना मा.डॉ.राठोड मँडम यांनी तंबाखू पासुन आपण सर्व कसे दुर रहाता येते त्याचे सोदाहरण स्पष्टीकरण दीले.तंबाखू मुळे कोणकोणते दुष्परिणाम होतात त्याचेही सोदाहरण सह स्पष्टीकरण दिले.

व्यसनापासुन दुर कसे रहायचे याचेही मार्गदर्शन केले.कार्यक्रम चे सुत्रसंचलन श्री रमेश लाड सर यांनी केले व आभार प्रदर्शन झाडके मँडम यांनी केले.यावेळी
विध्यालयाचे मु.अ.श्री फेरे सर,श्री रमेश लाड सर ,सवासे मँडम,झाडके मँडम,सगर मँडम व श्री विकास गायकवाड,श्री खराडे अश्विन ,श्री गिरी राजेंद्र, श्री तिवारी,व विध्यार्थी सहभागी झाले.









