Home latest News लातूर अनैतिक संबंधातून प्रियकराने केली तृतीयपंथीयाची हत्या

लातूर अनैतिक संबंधातून प्रियकराने केली तृतीयपंथीयाची हत्या

88

लातूर अनैतिक संबंधातून प्रियकराने केली तृतीयपंथीयाची हत्या

लातुर:- चाकूर तालुक्यातील चापोली येथे अनैतिक संबधातून एका एकवीस वर्षीय तृतीय पंथाची हत्या झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे . या प्रकरणी पोलिसांनी त्या तृतीयपंथीयाच्या जोडीदाराला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,चापोली जवळील लातुर नांदेड महामार्गावरील ब्रहमवाडी पाठी येथे तृतीयपंथी सुदर्शन विठ्ठलराव सुर्यवंशी वय २१ वर्षे रा.चक्री ता.हदगाव याची हत्या करण्यात आली आहे . सुर्यवंशी हा रस्त्यावरील वाहनाकडून पैसे मागून आपला उदरनिर्वाह चालवायचा. लातूर तालुक्यातील बोकनगाव तांडा येथील रहिवासी सुनिल मोतीराम राठोड याच्यासोबत त्याचे अनैतिक संबध सुरू झाले. दरम्यान शुक्रवारी सुनिल आणि सुदर्शन यांच्यात भांडण झाले. त्यानंतर सुनिलने सुदर्शनला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुदर्शनचा नंतर मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद झाला. याबाबत पोलीस निरिक्षक सोपान सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर स्वामी यांनी तपास सुरू केला. तपासात राठोड याने खुन केल्याचे उघडकीस आले. यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलीसांनी राठोड याला अटक केली आहे .