Home latest News मांडोदेवी येथे 16 मे रोजी रामानंदाचार्य संप्रदायाचा भव्य महिला मेळावा

मांडोदेवी येथे 16 मे रोजी रामानंदाचार्य संप्रदायाचा भव्य महिला मेळावा

13

अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून गोंदिया जिल्ह्यातील मांडोदेवी देवस्थान येथे शनिवार, 16 मे रोजी सकाळी 10 वाजता भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रामानंदाचार्य संप्रदायाच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे.

या महिला मेळाव्यास मुख्य मार्गदर्शक म्हणून रामानंदाचार्य संप्रदायाच्या अखिल भारतीय महिला सचिव वृंदाताई जोशी उपस्थित राहणार आहेत. तसेच पूर्व विदर्भ पीठ प्रमुख राजेंद्र भोयर, सहपीठ प्रमुख सुरेश लाखे, व्यवस्थापक प्रवीण परब, महिला निरीक्षक वैशाली चतुर आणि पुष्पाताई दडवे हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या भव्य महिला मेळाव्यात महिला संघटन, विविध योजना विषयक माहिती, संवाद, नृत्य, गायन तसेच महिलांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. कार्यक्रमात विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार असून कार्यक्रमस्थळी चहा, नाश्ता व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या भक्तीमय व आनंददायी महिला मेळाव्यात जिल्ह्यातील माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला अध्यक्षा नीलिमाताई वंजारी, संप्रदाय अध्यक्ष खांडवाये आणि निरीक्षक येरणे यांनी केले आहे.

प्रतिनिधी | गोरेगाव