मुंबई, स्वातंत्र्य दिनानिमित्त तीन रंगानी सजल सी.एस.एम.टी स्थानक

✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई:- 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन एक प्रकारे राष्ट्रीय उत्सव आहे. त्यामुळे हा दिवस संपुर्ण भारतात मोठ्या उत्साहवर्धक वातावरण साजरा करण्याची तयारी सुरु झाली आहे.
त्यामुळे स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या रेल्वे स्थानकावर तिरंगा झेंडाचा तीन रंगानी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. संपुर्ण मुंबईची जान असलेली ही इमारत तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. अनेकजण याठिकाणी सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. यंदा भारताचा 75 वा स्वातंंत्र्यदिन आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त लोकांत मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे.








