Home latest News महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस चे युवा नेते राकेश जाधव भाजपच्या वाटेवर
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस चे युवा नेते राकेश जाधव भाजपच्या वाटेवर
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
पनवेल : पनवेल शहरातील काँग्रेस चे युवा नेते राकेश जाधव हे भाजप पक्षाच्या वाटेवर असल्याचे दिसून येत असून त्यांनी या संदर्भात नुकतीच भाजप आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन पुढील वाटचाली संदर्भात चर्चा केली आहे .
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशा नुसार मागील महिन्यात ठाणे येथील झालेल्या आढावा बैठकी मध्ये काँग्रेस, महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,एन,एस,यु,आयकाँग्रेस आणि सेल विभागाच्या नियुक्ती नं केल्यामुळे प्रभाग क्रमांक १९ चे इच्छुक उमेदवार युवक क्रीडा काँग्रेस अध्यक्ष राकेश जाधव यांनी ऐन महानगपालिका निवडणूकीपूर्वी आपला पदाचा आणि पक्ष सदस्यवताचा राजीनामा जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील पनवेल शहर काँग्रेस अध्यक्ष लतीफ शेख यांच्याकडे सोपविला आहे . पनवेल शहरांत काँग्रेस पक्षाची मजबूत ढाल असलेली राकेश जाधव यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस पक्षाला प्रचंड मोठा धक्का बसला आहे नुकत्याच भाजपा चे विधान परिषदाचे आमदार विक्रांत पाटील यांची भेट घेतल्यामुळे राकेश जाधव यांचा भाजपा पक्षात जवळपास प्रवेश निश्चित मानला जात आहे. एकीकडे युवक अध्यक्षची 35 वय वर्ष मर्यादा असल्या नंतर ही काही पदाधिकारी अद्यापही मोठ्या पदावर बसले आहेत . या मनमानी विरोधात जाधव यांनी संताप व्यक्त करून ते लवकरच आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काँग्रेस पक्षाला राम राम करून बाहेर पडणार असल्याचं बोललं जातंय.