Home latest News ट्रैफिक जाम करणा-या अलिबाग एस.टी.स्टॅंड समोरील दुभाजकांची लांबी कमी करा.

ट्रैफिक जाम करणा-या अलिबाग एस.टी.स्टॅंड समोरील दुभाजकांची लांबी कमी करा.

72

समीर ठाकूर यांची मागणी.

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: अलिबाग एस.टी.स्टॅंड व आय.डी.बी.आय. बॅंकेसमोरील रस्ता दुभाजक खूपच लांबीचे असल्याने अलिबाग बसस्थानकातून बाहेर पडणा-या तसेच अलिबाग बसस्थानकामध्ये येणा-या बसेसना वळसा घेताना त्रास होवून या मार्गावर नेहमी वाहतुक कोंडी होत असते. यामुळे वाहतुक कोंडीस कारणीभूत ठरणारे अलिबाग एस.टी.स्टॅंड समोरील दुभाजकांची लांबी कमी करण्याची मागणी कॉंग्रेसचे अलिबाग शहर अध्यक्ष समीर मधुकर ठाकूर यांनी अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
या दुभाजकांच्या लांबी मुळे अलिबाग एस.टी.स्टॅंड जवळ नेहमीच वाहतुक कोंडी होत असते. यामार्गावर अनेकदा छोटे मोठे अपघात झालेले आहेत. अलिबाग शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी हा प्रमुख मार्ग असल्याने नागरिकांनाही या वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्ते दुभाजकांची लांबी कमी केल्यास या भागातील वाहतूक कोंडी फुटून वाहतुक सुरळीत होणार असल्याने अलिबाग एसटी स्टॅंड जवळील तसेच आय.डी.बी.आय बॅंकेसमोरील दुभाजकाची लांबी त्वरीत कमी करण्याची मागणी कॉंग्रेसचे अलिबाग षहर अध्यक्ष समीर मधुकर ठाकूर यांनी केली आहे.