Home latest News गोरगरीब कष्टकरी मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांची भूख भागवणारा अन्नदाता!,- श्री. प्रसाद कलिंगन

गोरगरीब कष्टकरी मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांची भूख भागवणारा अन्नदाता!,- श्री. प्रसाद कलिंगन

204

गोरगरीब कष्टकरी मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांची भूख भागवणारा अन्नदाता!,- श्री. प्रसाद कलिंगन

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862

मुंबई :- गोरेगांव पश्चिम प्रेम नगर मधे राहणारे सामाजिक कार्यकर्ते व गणेश मित्र मंडळाचे संस्थापक. श्री. प्रसाद कलिंगन यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक पूर्ण प्रेम नगर आणि गोरेगांव मधे केले जाते, सर्व सामान्य नागरिकांच्या मदतीला ते नेहमी अग्रेसर असतात, सर्व क्षेत्रामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख आवर्जून घेतला जातो.

प्रसाद कलिंगन हे त्यांच्या गणेश मित्र मंडळातर्फे विविध उपक्रम सर्वसामान्य जनतेसाठी राबवत असतात. त्यांची साई बाबांवर अपार श्रद्धा आहे व त्याच माध्यमातून दर गुरुवारी ते साईंच्या नावाने साईभंडारा चं आयोजन करण्यात येतो.

स्वत उपस्थित राहून स्वत च्या हाताने ते गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी पहाटे लवकर उठून भाज्या कटिंग पाणी सर्व व्यवस्थित ते करत असतात. भंडाऱ्याच्या स्वरूपात अतिशय चविष्ट गरमा गरम डाळ खिचडी व केळी आणि बुंदी शेव व कधी – कधी शिरा देण्यात येतो. सर्व तयार करून साडे नऊ नंतर भंडाऱ्याचा प्रसाद सर्व गोरगरीब जनतेला वाटण्यात येतो. तरी प्रत्येक गुरुवारी येथे भंडारा असतो हे आता सर्वतोपरी माहित असल्याने त्याचा हजारो भाविक लाभ घेत असतात. व गोरगरीब कष्टकरी जनता स्वत ची एक वेळेची भूख भागवताना पाहायला मिळते.

विशेष म्हणजे साई भंडाऱ्याच्या प्रसादपासून कोणीच वंचित राहत नाही. सर्व जनतेला प्रसाद पोटभर खायला मिळत असतो.गेले 15, 16 वर्ष भंडाऱ्याच आयोजन चालूच आहे व पुढे ही चालूच राहणार अशी ग्वाही ते हमेशा देत असतात. सर्व गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे व साईबाबांचे आशीर्वाद त्यांना मिळतात, त्याच्यातच त्यांना एक वेगळा समाधान मिळतो.