वर्ध्यात बंदूक आणि चाकू दाखवत दिवसाढळ्या बँकेवर दरोडा

वर्ध्यातील बँकेवर आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दरोडा पडला. दरोडेखोरांनी लाखोंची रोकड आणि साडेतीन किलो सोने लुटले. त्यानंतर कर्मचाऱ्यांची दुचाकी घेऊन पसार झाले.

या दरोड्याची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. बोटांचे ठसे आणि दरोडेखोरांचे रेखाचित्र तयार करण्याचे काम सुरू आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली जात आहे. सकाळी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे वर्ध्यामध्ये खळबळ माजली आहे.








