Home latest News बाइक चोरली पण पोलिसांच्या नाकाबंदीत सापडला; तळोजा वाहतूक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
बाइक चोरली पण पोलिसांच्या नाकाबंदीत सापडला; तळोजा वाहतूक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747
तळोजा : तळोजा वाहतूक पोलीस हद्दीमध्ये वाहतूक नियमन करीत असताना एका दुचाकी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता धूम स्टाईलने चालक पळून गेला. यावेळी तो चालवत असलेली दुचाकी चोरीची असल्याचं समोर आलं. व मालकाच्या ताब्यात दुचाकी दिली. याबद्दल दुचाकी मालकाने वाहतूक पोलिसांचे वाहन मालकाने आभार मानले.
मिळालेल्या माहितीनुसार तळोजा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस पोहवा डावकरे व पोशी देवकते हे आरएएफ सिग्नल येथे वाहतुकीचे नियमन करीत होते. यावेळी पनवेच्या दिशेने आलेली एक दुचाकी MH 24 AM 6873 या दुचाकीवरील चालक व त्याच्या पाठीमागे बसलेल्या इसमाची हालचाल ही वाहतूक पोलिसांना संशयितरित्या वाटली. या दरम्यान देवकाते व डावकारे यांनी त्या दुचाकी चालकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दोघांनी ती मोटारसायकल जागेवरच सोडून पळून गेले. यावेळी ही माहिती वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देऊन त्या दुचाकी ची सर्व माहिती काढली व मूळ मालकाचा शोध लावून दुचाकी मालक ओंकार गायकवाड यांना तळोजा येथे बोलावून तळोजा पोलीस ठाण्यात ती दुचाकी पुढील कारवाईसाठी देण्यात आली. याबाबत चोरीला गेलेली दुचाकी सापडल्याने मालक गायकवाड यांनी वाहतूक पोलिसांचे आभार मानले.