Home latest News IPL 2021: गोष्ट कॅमेऱ्यामागच्या आयपीएलची

IPL 2021: गोष्ट कॅमेऱ्यामागच्या आयपीएलची

99

IPL 2021 Play-Off: गोष्ट कॅमेऱ्यामागच्या आयपीएलची 

IPL behind the scene
गोष्ट कॅमेऱ्यामागच्या आयपीएलची

सिद्धांत
मुंबई दि. १० ऑक्टोबर २०२१: IPL २०२१ च्या प्लेऑफला आजपासून सुरुरवात असून दिल्ली, चेन्नई, बंगलोर आणि कोलकाता हे चार संघ विजेतेपदासाठी लढणार आहेत. IPL २०२१ हे IPL चे १४ वे वर्ष आहे. ह्या स्पर्धेमुळे भारतीय क्रिकेट आणि खेळाडू यांच्या खेळाचा स्तर एक वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहचला आहे. त्यामुळे ह्या स्पर्धेला फार मोठा इतिहास आहे. कॅमेराच्या आड चालणाऱ्या IPL च्या काही गुजगोष्टी आहेत. चला तर जाणून घेऊया.

आयपीएलची सुरुवात खरतर १९९५ सालीच होणार होती. आयपीएलचे मास्टरमाईंड ललित मोदी यांनी १९९५ साली एक दिवसीय फॉरमॅटच्या आयपीएलची संकल्पना बीसीसीआय समोर मांडली होती. पण बीसीसीआयने तो प्रस्ताव नाकारला.

आयपीएल मध्ये खेळल्या जाणाऱ्या १ बॉलच्या प्रक्षेपणाची किमंत तब्बल २४ लाख असते. आयपीएलच्या एका मॅचच्या प्रक्षेपणासाठी स्टार स्पोर्ट्सला ५७ कोटी खर्च करावे लागतात.

गोलंदाज झहीर खान आयपीएलच्या पहिल्या आणि पाचशेव्या सामन्यात खेळणारा एकमेव खेळाडू आहे. पहिल्या सामन्यात झहीर खान बेंगलोर संघाकडून खेळत होता तर पाचशेव्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हील्स संघाकडून खेळात होता.आयपीएलचा पहिला चेंडू प्रवीण कुमारनी टाकला होता आणि सौरव गांगुलीनी तो खेळला होता.

आयपीएलचा पहिला चौका आणि पहिला छक्का ब्रॅंडन मॅक्युलम यांनी मारला होता.

आयपीएलचा पहिला विकेट झहीर खान यांनी घेतला होता.

आयपीएलची पहिली कॅच जॅक कॅलिस याने घेतला होता.

आयपीएलच्या इतिहासात ऍडम गिलख्रिस्ट याच्या नावे अनोखा विक्रम आहे. त्यांनी सामन्यामध्ये फक्त एकच बॉल टाकला आणि त्या बॉलवर विकेट घेतला होता.

किंग्स इलेव्हन पंजाबच्या जर्सीवरील याचा अर्थ जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब ,हिमाचल प्रदेश असा आहे.

प्रत्येक आयपीएल संघाला एक सामना खेळण्यासाठी बीसीसीआयकडे ५० लाख रुपये भरावे लागतात. तसेच ज्या स्टेडियमवर आयपीएलचा खेळाला जातो ते स्टेडियम प्रत्येक सामन्यातून एक करोड रुपयाची कमाई केली करते.

आयपीएल सामन्यादरम्यान १० सेकंदांच्या जाहिरातीसाठी जाहिरातदारांना १२.५ लाख खर्च करावे लागतात.

खास आणि महागडी तिकीट खरेदी करणाऱ्या प्रेक्षकांसाठी आयपीएल सामन्यादरम्यान जवळपास ६००० लोकांच्या जेवणाची व्यवस्था स्टेडियममध्ये केली जाते.

आयपीएलच्या एका सामन्यासाठी २००० पोलिसांचा बंदोबस्त असतो. त्याचबरोबर ३०० पेक्षा जास्त खासगी सुरक्षारक्षकांद्वारे स्टेडियम परिसरात बंदोबस्त ठेवला जातो.

आयपीएलच्या एका सामन्याचे यशस्वी प्रक्षेपण करण्यासाठी जवळपास ७००-८०० लोक काम करत असतात.