Home latest News मुलुंडचा दलाल’ म्हणत संजय राऊतांचे किरीट सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

मुलुंडचा दलाल’ म्हणत संजय राऊतांचे किरीट सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

110

फडणवीस सरकारने सत्तेत असताना २५ हजार कोटींचा महा-आयटी घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप

मुलुंडचा दलाल’ म्हणत संजय राऊतांचे किरीट सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. :- 9768545422

मुंबई : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकार आणि तत्कालीन फडणवीस सराकरवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांनी फडणवीस सरकारने सत्तेत असताना २५ हजार कोटींचा महा-आयटी घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही जोरदार टीका राऊत यांनी केली.

शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय बोलताना हे गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस सरकारवर आरोप करताना त्यांनी हरियाणामधील दूधवाला एन नरवार यांच्या नावाचा उल्लेख केला. या दूधवाल्याने मागील पाच वर्षात ७ हजार कोटींची संपत्ती जमवली असून ईडी त्याला ओळखते का ? असा सवाल देखील राऊत यांनी केला. त्याच्याजवळील पैसा नेमका कोणाचा आहे, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित करून भाजपला लक्ष्य केले आहे.

हे आपण वाचलंत का?

दरम्यान, राऊत यांनी माजी खासदार किरीट सोमय्या आणि निल सोमय्या या दोन्ही पिता-पुत्रांवर देखील गंभीर आरोप केले आहेत. तसेच ‘मुलुंडचा दलाल’ असे किरीट सोमय्या यांना संबोधून पीएमसी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे. तसेच भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर देखील राऊत यांनी जोरदार टीका केली.