Home latest News ’स्टार महाराष्ट्र अवॉर्ड’ सोहळ्यात न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेचा सन्मान

’स्टार महाराष्ट्र अवॉर्ड’ सोहळ्यात न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेचा सन्मान

70

दादरमध्ये झालेल्या ‘स्टार महाराष्ट्र अवॉर्ड’ सोहळ्यात न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेचा सन्मान

मुंबई: दादर येथे आयोजित भव्य ‘स्टार महाराष्ट्र अवॉर्ड’ फंक्शनमध्ये न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेचे सचिव व संचालिका मा. अनिता ताई खरात, तसेच मा. विजय काळे सर आणि मा. महेश गडांकुश यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.

शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कार्य करत संस्थेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन आयोजकांनी हा पुरस्कार प्रदान केला. पुरस्कार स्वीकारताना अनिता ताई खरात यांनी संस्थेच्या सर्व शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानत पुढील काळातही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी या तिघांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.