Home latest News श्रीकांत थळे यांच्या डॉ. श्रद्धा मुलीच्या हळदीला अनेक मान्यवरांची हजेरी.
श्रीकांत थळे यांच्या डॉ. श्रद्धा मुलीच्या हळदीला अनेक मान्यवरांची हजेरी.
भागवत जाधव
अलिबाग
८८०५०२२५६५
अलिबाग:श्रीकांत थळे राहणार मोठे शहापूर यांच्या मुलीच्या हळदीला अनेक मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम त्यांच्या सुमंगल सोसायटी अलिबाग मध्ये झाला श्रीकांत यांचा चांगला जनसंपर्क व दिलदार व्यक्ती मत्व हे त्यांचे वैशिष्ट्य त्यांचे मूळ गावं शहापूर ते JSW डोलवी येथे कार्यरत होते.
हळदीचा कार्यक्रम एकदम शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित केला होता सुंदर सजावटी सोबत शहापूर येथील वाद्यवृंद यांनी हळदीला शोभा आली. महिला, पुरुष, बाल बच्चे यांनी छान नृत्य सादर केले.
उपस्थितीत मान्यवर श्री.संजय पाटील,श्री प्रशांत फुलगावकर,श्री.देशमुख,श्री.यतीन घरात,आणि श्री.प्रल्हाद म्हात्रे,सौ. प्रणिता म्हात्रे होते सोबतच JSW येथील कर्मचाऱ्यांनी चांगली उपस्थिती लावली.
येणाऱ्या पाहुण्या साठी व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची चांगली सोय केली होती.पाहुणे मंडळी ने वधूला शुभेच्छा देत निरोप घेतला विवाह कल्याण येथे रिव्हर ओ डेक, मोनालिसा बँकेट् हॉल मध्ये संपन्न होणार आहे.