एकतर्फी प्रेमातून गळा आवळून मैत्रिणीची हत्या, मृतदेह फेकला कालव्यात.

हैद्राबाद :- एकतर्फी प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्याने कॉलेजमधील विद्यार्थीनीची गळा आवळून हत्या केली. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात ही घटना घडली. नरसारावपेटमध्ये एका खाजगी कॉलेजची विद्यार्थी अनुषाला तिच्याच कॉलेजमधील विष्णुवर्धन रेड्डीने जबरदस्ती आपल्या बाईकवर बसवलं आणि तिला पालपाडू रोडच्या कडेला घेऊन गेला. येथे या दोघांमध्ये वाद झाला. विष्णुवर्धन एकतर्फी प्रेम करत होता. अनुषाला त्याने घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण, ती ऐकली नाही, तेव्हा त्याने गळा आवळून तिची हत्या केली आणि तिला कालव्यात फेकून तेथून निघून गेला. त्यानंतर त्याने स्वत: पोलिसांसमोर आत्मसपर्पण केलं.
मृत विद्यार्तीनीच्या आई-वडिलांनी आरोप केला आहे की प्रेम करत नसल्याने विष्णुवर्धनने अनुषाची निर्घृणपणे हत्या केली. आई-वडिलांनी न्यायाची मागणी करत ते मृतदेहासोबत आंदोलनावर बसले आहेत यादरम्यान, नरसारावपेट शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थिनी अनुषाच्या हत्येनंतर विरोधात विद्यार्थी, स्थानिक लोक आणि पीडित कुटुंब रस्त्यावर उतरलं आहे. कुटुंब मृतदेहासह पल्नाडु बस स्टँडजवळ धरणे आंदोलनावर बसले आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.








