Home latest News गोरेगांव मनसे शाखा अध्यक्ष – श्री. भूषण फडतरे, देशमुख यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना...

गोरेगांव मनसे शाखा अध्यक्ष – श्री. भूषण फडतरे, देशमुख यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना पावसाळापूर्वी नालेसफाई पूर्ण करा दिल्या सूचना

96

गोरेगांव मनसे शाखा अध्यक्ष – श्री. भूषण फडतरे, देशमुख यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना पावसाळापूर्वी नालेसफाई पूर्ण करा दिल्या सूचना

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862

मुंबई :- गोरेगांव पश्चिम प्रेम नगरच्या वसाहतिमध्ये नागरिकांच्या पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या व त्यातून होणारे आर्थिक नुकसान, नाले, गल्लीतले रस्ते व इतर समस्या जाणून घेऊन तिथले समाजसेवक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष. श्री. भूषण भाई फडतरे यांनी तात्काळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क करून त्यांना प्रेम नगर मध्ये येण्यास भाग पाडले.

पालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन भूषण भाई यांनी संबंधित वसाहतीची संपूर्ण पाहणी करून तिथल्या नागरिकांच्या समस्या त्यांच्या पुढे मांडल्या. आणि या सर्व समस्यांचे निवारण कधी होणार, याचा जाब विचारत संपूर्ण वसाहतिमधल्या नागरिकांसमोरच पालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं.

आता 3 महिन्यांनी पाऊस सुरु होणार आहे, त्यापूर्वी लवकरात लवकर वसाहतीची कामे पूर्ण झाली पाहिजे. अशी सूचना पालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. नाहीतर आम्हाला मनसे स्टाईल आंदोलन करावा लागेल, असा दमच भूषणभाई फडतरे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला.

गोरेगांव प्रेम नगर हे स्लम वसाहत असून तेथे हजारो सर्व धर्म लोकं वास्तव्याला आहेत. वसाहतिमध्ये अपूर्ण सुविधा आहेत तिथे कोणीच फारसं लक्ष देत नाही, आमदार, खासदार, नगरसेवक यांच्या विचलित लक्षणामुळे प्रेम नगरचा विकास होऊ शकला नाही. आणि हि बाब कोणीच नाकारू शकत नाही. वसाहतिमध्ये अनेक नागरिकांच्या अडचणी आहेत, त्यांच्या समस्या अद्याप कोणीच सोडवू शकला नाही, निवडणुका आल्या कि फक्त प्रेम नगरच्या नागरिकांचा फक्त मतांसाठी वापर करून घ्यायचा. व 5 वर्ष सत्ता भोगायची, असेच कित्येक वर्ष हीच प्रता चालत आली आहे. आता तरी प्रेम नगरची जनता जागृत व्हावी, व समाजासाठी लढणाऱ्या माणसाच्या मागे उभी राहावी.

तरी भूषण भाई यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना तिथल्या नागरिकांसमोर उभे करून नागरिकांचे पावसाळ्यात होणारे हाल, नालेसफाई न झाल्यामुळे पावसाचे पाणी गटारात तुंबून घरामध्ये येऊन आर्थिक नुकसान कसं होतं ते सांगण्यात आलं व गल्लीतले तुटलेले रस्ते पावसाळापूर्वी करण्यात यावे अशी कैफियत नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली. नंतर श्री. भूषण भाईंनी नागरिकांना संबोधताना सांगितले कि मी आता तुमच्या समोर पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन येऊन तुमच्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या आहेत, आणि त्याचं ते लवकरात लवकर निवारण करतील असा मला विश्वास आहे, व नाही केलं तर मी त्यांना माझा आंदोलनाचा इशारा दिलाय, एवढं बोलून श्री. भूषण भाईंनी नागरिकांना आश्वासित केले. आणि प्रेम नगरच्या वसाहतिमधल्या नागरिकांनी सुद्धा श्री. भूषण भाई व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.