महिलांसाठी कठोर कायदे असून सुद्धा महिला असुरक्षित – प्रा. डॉ. मनीषा देशमुख
घाटनांदुर (प्रतिनिधी) येथील वसुंधरा महाविद्यालयात महिला तक्रार निवारण विभाग व राष्ट्रीय महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमानाने कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळ प्रतिबंध आणि निवारण कायदा या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. मनीषा देशमुख बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ अर्जुन मोरे होते तर प्रमुख पाहुणे समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ मनीषा देशमुख होत्या. यावेळी मंचावर आय.क्यू.ए.सी च्या समन्वयक प्रा. डॉ. अलका देशमुख व महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा प्रा. डॉ.बायजा कोटुळे उपस्थित होत्या. यापुढे डॉ. देशमुख म्हणाल्या की,आज महिलासाठी कठोर कायदे आहेत पण महिलावर अन्याय, अत्याचार होताना दिसत आहेत. यासाठी महिलांनी कायद्याचा अभ्यास करून अन्याय, अत्याचाराचा विरोधात आवाज उठवला पाहिजे असे प्रतिपादन केले. तर अध्यक्षीय समारोपात प्रभारी प्राचार्य डॉ. मोरे म्हणाले की, पाँस कायद्याने नोकरी करणाऱ्या महिलांना संरक्षण भेटले आहे असे प्रतिपाद्य केले. यावेळी लैंगिक संवेदनशिलतेची शपथ सर्वांना देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आय.क्यू.ए.सी. च्या समन्वयक प्रा डॉ अलका देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.बायजा कोटुळे व आभार प्रा. डॉ.सखाराम वाघमारे यांनी मानले. या कार्यशाळेसाठी प्रा. अविनाश पुरी सहमहाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









